विमान - एक स्वप्न

जिल्हा परिषदेच्या शाळेत बस्करं घालून, एका लाईनीत बसून, सुरात " या वाऱ्याच्या बसुनी विमानी " गाणी म्हणनारे आम्ही मला अजूनही आठवतो. ते गाणं गातानाही एक वेगळीच नशा डोक्यात आणि मनात असायची कारण "विमान" हा माझा अत्यंत जवळचा विषय आहे. काही स्वप्नं आपल्याला पाहावी नाहीत लागत, ती जन्मतःच आपल्यासोबत असतात कदाचित, तसंच माझं लहानपणीपासून विमानात बसण्याचं आणि foreign ला जाण्याचं स्वप्न होतं. तेंव्हा foreign म्हणजे अमेरिका इतकंच माहिती होतं (पण अमेरिकेत वास्तव्य आणि करिअर हा स्वप्नाचा भाग नव्हता). गावाकडे त्यावेळी सहसा विमानं दिसायची नाहीत. त्यामुळे कधी तरी आकाशात चमकणाऱ्या, चांदण्यासारख्या दिसणाऱ्या विमानाच्या lights सुद्धा नजरेआड होइस्तोपर्यंत पाहायचो. कधीकधी विमानांचे फक्त आवाज ऐकायला यायचे, गुडघ्यापर्यंतचा फ्रॉक घालून , मान वर करून आकाशभर विमान शोधणारी मी मला अजूनही आठवते ☺ ️. नंतर मी प्रत्येक सुट्ट्यांमध्ये मावशीकडे मुंबईला जायचे आणि तिकडे airport जवळ असल्या कारणानी मला बाल्कनीतून खुपसारी विमानं पाहायला मिळायची. विमानांचे रंग, आकार, किती जवळून दिसल...